शीतल महाजन या महाराष्ट्रीय महिला खेळाडूने पॅराजम्पिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या शीतलने आर्टीका व अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर पॅराजम्पिंग करण्याचा पराक्रम केला आहे. पॅराजम्पिंगचा हा असा थरार करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. शीतलच्या नावावर पाच विश्वविक्रम, १४ राष्ट्रीय विक्रमांची नोंद असून तिने आजवर ६६४ हून अधिक जम्प्स केले आहेत. शीतल महाजनला उत्तर ध्रुवावर तब्बल २४ हजार फूटांवरून पॅराजम्पिंग करताना सामोर आलेली आव्हानं, संपूर्ण तयारी आणि अनुभवांची चित्रफीत सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे. त्यास नेटिझन्स भरभरून पसंती देखील देत आहेत.