शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत शिवसेनेची भूमिका व एकूण निर्णयाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील निशाणा साधला. “आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदर करतो बाबाजी आमचे देखील आहेत, परंतु तरी देखील देशाच्या एका प्रमुख राजकीय पक्षाचे नेते इथे येतात आणि त्यांच्यावर गोळीबार होतो. याचा अर्थ काय आहे?” असा सवाल त्यांनी केला.

माध्यमांशी बोलाताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा आम्ही लोकसभेत खातं देखील उघडलं आहे. दादरा-नगर हवेलीची निवडणूक झाली, जो केंद्रशासीत प्रदेश आहे. गुजरातशी जुडलेला प्रदेश आहे. भाजपाच गड मानला जात होता. यावेळी ती लोकसभेची जागा शिवसेनेने मोठ्या बहुमातने जिंकली आहे आणि आम्ही दक्षिण गुजरातच्या दिशेने पुढे जाऊन निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण देशात निवडणूक लढवू मात्र सुरूवात उत्तर प्रदेशपासून होईल.”

UP election : “उत्तर प्रदेशची निवडणूक आणि निकाल देशाच्या राजकारणाची…” ; संजय राऊत यांचं लखनऊमध्ये विधान

तसेच, “उत्तर प्रदेशचे वातावरण तुम्ही सर्वजण जाणता, काल ओवेसींवर देखील हल्ला झाला. आम्ही निंदा केली, इथं कायद्याबाबत मोठमोठ्या गप्पा केल्या जातात, कायदा सुव्यवस्थेबद्दल बोललं जातं. या राज्यात माफियाराज संपला अशा प्रकारचं बोललं गेलं. चांगली गोष्ट आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदर करतो बाबाजी आमचे देखील आहेत, परंतु तरी देखील देशाच्या एका प्रमुख राजकीय पक्षाचे नेते इथे येतात आणि त्यांच्यावर गोळीबार होतो. याचा अर्थ काय आहे?” असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “या राज्यात, देशात अनेक प्रश्न आहेत. सर्वाधिक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. सर्वात मोठं शेतकरी आंदोलन उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी केलं आहे. यामुळे आमच्यासोबत किसान रक्षा पार्टीचे नेते बसलेले आहेत. तर आम्ही निवडणूक लढवणार आणि ही निवडणूक २०२४ च्या परिवर्तनाचे अतिशय महत्वपूर्ण पाऊल असेल. जे पण निकाल येतील, त्याचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल.” असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.