गुडगावमध्ये  एका खुल्या नाट्यगृहात सुरु असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमास शिवसेनेने उधळून लावले आहे. बांझ नाटकाच्या प्रयोगात चार पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असल्याची माहिती मिळताचं शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी पोहोचून गोंधळ घातला.
लाहोरमधून चार कलाकार नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते त्याचवेळी काही कलाकारांनी स्टेजवर जाऊन पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या आणि हा कार्यक्रम बंद पाडला. शिवसैनिकांच्या या भूमिकेविषयी पाकिस्तानी कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी पोलिसांनी ४ शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. आम्ही सुरक्षेसाठी पोलिसांना सूचना दिली होती. मात्र,  काही पोलीस घटनास्थळी आले. पण लगेच निघून गेले. ते जाताच पुन्हा गोंधळ घालत कार्यक्रम उधळून लावण्यात आल्याचा आरोप कार्यक्रमाच्या आयोजक त्रिखा यांनी केला. दरम्यान, आमच्याकडे निषेध करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र, आम्ही शांतीपूर्वक रित्या या कार्यक्रमाला निषेध केला असून पाकिस्तानी कलाकार जिथे पाय ठेवतील तिथे जाऊन आम्ही निषेध करू अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.
काही दिवसांपूर्वी गायक गुलाम अलींच्या मुंबईतील कार्यक्रमालाही सेनेने विरोध केला होता. त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावरून गोंधळ घातला होता.