इंग्रजी भाषेचे भूत याआधीच उतरविणे गरजेचे होते, अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहाण यांनी इंग्रजी भाषेच्या मक्तेदारीला आपला विरोध व्यक्त केला़  येथील दत्तोपंत ठेंगडी संशोधन संस्थेत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होत़े केवळ मूठभर लोक इंग्रजी बोलू शकतात़  तरीही इंग्रजीविना काहीच शक्य नाही, असे ही मंडळी भासवत असतात़  समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत इंग्रजी बंधनकारक करण्यात यावी, असे या मूठभर लोकांना वाटत नाही़  कारण त्यामुळे दुर्गम भागातील लोकसुद्धा उच्च प्रशासकीय अधिकारी पदांपर्यंत पोहोचू शकतील, अशी भीती वाटते, असेही ते पुढे म्हणाल़े