राज्यातील प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवरील एक गंभीर सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख सांगत वादग्रस्त शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईचा इशारा दिला आहे.

“भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही.  भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

काय गोंधळ झालाय?

भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये खासदाराचे नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा म्हणजेच रावेरचा उल्लेख करण्याऐवजी या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असं लिहिण्यात आल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झालाय. हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर आता तरी रक्षा खडसे यांच्या फोटोखालील हा उल्लेख काढून तेथे मतदारसंघाचं नाव टाकून चूक सुधारण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (Raver) रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यानं हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.