नवी दिल्लीत गुरुवारी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तीने भाजपा नेते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या दिशेने चप्पल फेकली. सुदैवाने नरसिम्हा राव थोडक्यात बचावले. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यासंदर्भात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या व्यक्तीने चप्पल फेकली त्याला लगेच तिथे असलेल्या अन्य लोकांनी पकडले व बाहेर घेऊन गेले. चप्पल फेकणारी व्यक्ती कानपूरची असल्याची माहिती मिळत आहे. चप्पल फेकणारा माणूस हॉलमध्ये सर्वात पुढे बसला होता.

आरोपीचे नाव गोपाल भार्गव असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. नेत्यांवर पत्रकार परिषदेत बूट किंवा चप्पल फेकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoe hurled at bjp mp gvl narasimha rao
First published on: 18-04-2019 at 13:44 IST