दक्षिण काश्मीर भागातील शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशवतवाद्यांचा खात्मा झाला, दोन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या देखील परिसरात चकमक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील कनिगाम या गावात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांकडून परिसरास वेढा देण्यात आला व शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. त्यानंतर जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरू झाल्याने चकमक सुरू झाली.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून, जवानांकडून परिसरात फ्लड लाईट्स देखील लावले गेले. यानंतर चकमक सुरूच राहिली दरम्यान आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopian encounter update one more unidentified terrorist neutralised two 2 terrorists neutralised msr
First published on: 26-12-2020 at 14:14 IST