श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये नवी दिल्ली पोलिसांना आफताब पूनावालाविरोधात मोठा पुरावा हाती लागला आहे. दिल्ली पोलिसांनी एक जुनं सीसीटीव्ही फुटेज शोधून काढण्यात यश मिळालं आहे ज्यामध्ये आफताब पुनावाला दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज १८ ऑक्टोबरचं आहे. यामध्ये आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाचा खून करणारा आफताब स्वत:च्या घरातून रात्री तीन ते चारच्या दरम्यान घराबाहेर पडताना दिसत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन विल्हेवाट लावणारा आफताब रोज रात्री घराबाहेर पडून आजूबाजूच्या जंगलामध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकायचा हे याआधीच्या तपासामध्येच स्पष्ट झालं आहे. सध्या समोर आलेल्या सीसीटीव्ही फुजेटमध्ये आफताब रात्री तीन ते चारच्या दरम्यान हातात एक बॅग घेऊन जाताना दिसत आहे.

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जंगलात मारत असलेल्या फेऱ्यांपैकी शेवटच्या दोन फेऱ्यांमधील दृष्य कैद झाली आहे. छत्तरपूरच्या जंगलासह मेहरौलीमध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं समोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज आफताब आणि श्रद्धा राहत असलेल्या मेहरौली परिसरामधील त्यांच्या भाड्याच्या घराबाहेरील रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधील आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज आणि त्याची रेकॉर्डींग असणारा डीव्हीआर डेटा ताब्यात घेतला आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु

आफताबाला या सीसीटीव्ही फुटेजबद्दल विचारलं असता…
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार या फुटेजसंदर्भात आफताबकडे पोलिसांनी विचारणाही केली. यावेळेस आफताबने फोटोत दिसणारी व्यक्ती आपणच असल्याचं कबूल केलं आहे. तसेच त्याने, “हे फुटेज आपण श्रद्धाच्या मृतदेहाचे शेवटचे काही तुकडे फेकण्यासाठी गेलो होतो तेव्हाचं आहे,” असा जबाब दिला आहे. त्यामुळेच आता पोलिसांना आफताबविरोधातील प्रकरणामध्ये हे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून वापरता येणार आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

घरी आणि ऑफिसात तपासणी
दिल्ली पोलिसांनी रविवारी छत्तरपूरच्या जंगल परिसरात नव्याने शोधमोहीम राबवली. तसेच आरोपी आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या मेहरौली परिसरासह संपूर्ण शहरातही नव्याने तपास करण्यात आला. मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांनी श्रद्धाच्या तुकडे केलेल्या शरीराचे उर्वरित भाग व खुनाचे हत्यार जप्त करण्यासाठी मेहरौलीत कसून झडती घेतली. तसेच श्रद्धा आणि आफताब राहत होते त्या भाड्याची घराचीही वारंवार कसून झडती पोलिसांकडून घेण्यात आली. आफताब पूर्वी ज्या कार्यालयात काम करत होता त्या कार्यालयाजवळील गुरुग्राममधील वन विभागातही दिल्ली पोलिसांचे पथक शोध घेत आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान

आज नार्को टेस्ट
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासाचा एक भाग म्हणून पुरावे गोळा करण्यासाठी एका वेगळ्या पथकाने आफताब व श्रद्धा राहत असलेल्या घरास भेट दिली. पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे. सोमवारी रोहिणी उपनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी होण्याची शक्यता आहे. आफताबची पाच दिवसांची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

तीन राज्यांत पथके
या खून प्रकरणातील पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी महाराष्ट्र, हरियाणा व हिमाचल प्रदेशात पथके पाठवली होती. मुंबई सोडल्यानंतर वालकर व पूनावाला हिमाचल प्रदेशसह अनेक ठिकाणी गेले होते. आणि त्या सहलींदरम्यान पूनावालाला श्रद्धाची हत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या काही घटना घडल्या का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी या स्थळांना भेटी देऊन तपास केला.