देशभरामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लव्ह-जिहादसंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. गहलोत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना भारतीय जनता पार्टीलाही लक्ष्य केलं आहे. या विषयावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आफताब मराठी असता तर तू…”; २०१४-१५ मधील ठाण्यातील भेटीचा किस्सा चर्चेत

गेहलोत यांनी श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत ही एक दुर्घटना असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेला नाव देण्यात आलं असून यासंदर्भात विधाने केली जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गेहलोत यांनी हे मत व्यक्त केलं. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या धर्मातील लोकांची एकमेकांशी लग्न होत आली आहेत. मात्र तुम्ही त्याला एकाच धर्माच्या नावाने लक्ष्य केलं आहे. याच आधारावर राजकारण केलं जात आहे, असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

लव्ह जिहाद खरोखर आहे असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर गेलहोत यांनी, “ही एक दुर्घटना आहे. याला नावं देण्यात आली आहेत. यासंदर्भात भाष्य केलं जात आहे. अनेक शतकांपासून वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक एकमेकांशी लग्न करतात. यात नवीन काहीही नाही. मात्र तुम्ही एका धर्माला आणि समाजाला लक्ष्य केलं असून त्या आधारे तुमचं राजकारण सुरु आहे. या राजकारणाचा फायदा तुम्हाला होत आहे. कारण धर्म आणि जातीच्या नावाने लोकांना एकत्र आणणं, गर्दी गोळा करणं सोप काम आहे. आग लावणं सहज शक्य आहे. आग विजवायला वेळ लागतो,” असं गेहलोत म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: त्यावेळी आफताब-श्रद्धानं एकत्र असताना केली होती गांजाची खरेदी; पोलिसांना पुरावेही सापडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारीच श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी झाली.