श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपी आफताब अमीन पूनावालाची नार्को चाचणी करण्यात येत आहे. नार्को चाचणीतून श्रद्धाच्या खून प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यात श्रद्धाचा खून केल्यानंतर दुसऱ्या एका तरुणीच्या संपर्कात होता. त्या तरुणीला श्रद्धाच्या खून प्रकरणात आफताबचे नाव समोर आल्यानंतर धक्का बसला आहे. तसेच, श्रद्धाच्या खूनानंतर दोनदा आफताबच्या फ्लॅटला भेट दिली होती. पण, श्रद्धाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते, याची तिला कल्पना नव्हती, असे तिने सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या खूनानंतर आफताब बंबल अ‍ॅपच्या माध्यमातून १५ ते २० मुलींच्या संपर्कात होता. बंबल अ‍ॅपची तपासणी केली असता, ३० मे रोजी आफताब ज्या तरुणीच्या संपर्कात होता, ती सापडली आहे. ही तरुणी मानसोपचारतज्ज्ञ आहे. तिचा जवाब नोंदवण्यात आला आहे. तसेच, आफताबने श्रद्धाची अंगठी तिला दिली होती, ती जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : आफताबने आधीपासूनच रचला होता श्रद्धाच्या खूनाचा कट? पॉलीग्राफी चाचणीत विचारण्यात आले ‘हे’ सात प्रश्न

पोलिसांना तरुणीने दिलेल्या जबाबात सांगितलं की, ऑक्टोबर महिन्यात आफताबच्या फ्लॅटला भेट दिली होती. पण, तिला खूनाची अथवा मृतदेहाचे तुकडे घरात असल्याची माहिती नव्हती. आफताब कधीही घाबरलेला दिसला नाही. तो सामान्य आणि काळजी घेणारा वाटला. त्याच्याकडे अनेक परफ्यूमचा संग्रह होता. तो तिला अनेकदा परफ्यूम भेट म्हणूनही देत असे.

हेही वाचा : श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आफताबला धुम्रपानाचे व्यसन होतं. पण, धुम्रपानाचे व्यसन सोडण्याची इच्छा असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं होतं. तसेच, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची खूप आवड होती. वेगवेगळ्या हॉटेल्समधून मांसाहारी जेवण तो मागवत असे. पण, श्रद्धाचा खून आफताबने केल्याचं समोर आल्यानंतर मानसिक धक्का बसला आहे. त्यावर समुपदेशन देखील सुरु आहे, असे तरुणीने पोलिसांनी तपासात सांगितलं आहे.