लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा प्रमुख (LTTE Chief) वेलुपिल्लई प्रभाकरन जिवंत असल्याचा धक्कादायक दावा वर्ल्ड तामिळ फेडरेशनचे अध्यक्ष नेदुमारन यांनी सोमवारी केला होता. या दाव्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, यासंदर्भात श्रीलंका सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघ पुनर्रचनेचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने विरोधातील याचिका फेटाळली

यासंदर्भात बोलताना श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल नलीन हेराथ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, तामिळ नेत्याने केलेलं विधान एक मस्करी असू शकते. प्रभाकरनचा मृत्यू २००९ मध्ये झाला. आमच्याकडे त्याचे डीएनएचे पुरावे आहेत. या डीएनएवरून त्याच्या मृत्यूची पुष्टीही झाली आहे.

हेही वाचा – ‘न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत न्यायवृंदाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंगळवारी तामिळ फेडरेशनचे अध्यक्ष नेदुमारन यांनी प्रभाकरण जिवंत असून तो सुखरुप आहे आणि लवकरच सर्वांसमोर येतील, असा खळबळजनक दावा केली होता. मी LTTE प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरणबद्दल काही सांगू इच्छितो. ते जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत. आम्हाला विश्वास आहे की यामुळे त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या अफवांना पूर्णवराम लागेल, असे ते म्हणाले होते.