Sinzo Abe great contribution India Japan friendship Prime Minister Modi Tribute Funeral ysh 95 | Loksatta

भारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते

टोक्यो येथील निप्पॉन बुडोकन येथे मंगळवारी आबे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते
भारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते

पीटीआय, टोक्यो : ‘‘भारत-जपान संबंधांना नवी उंची देण्यात जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत भारत-जपान संबंध दृढ करताना आबे यांनी जपानच्या परराष्ट्र धोरणालाही नवे आयाम दिले,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आबे यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी श्रद्धांजली वाहिली.  

हेही वाचा >>> ‘वैद्यकीय शिक्षण सुधारणांच्या नावे काँग्रेसने पैसे कमावले’

हेही वाचा >>> ‘पीएफआय’च्या आणखी १७० जणांना अटक; दहशतवादी कारवायांना पाठबळाचा आरोप: महाराष्ट्रासह सात राज्यांत कारवाई

८ जुलै रोजी जपानच्या नारा शहरात निवडणूक प्रचारसभेदरम्यान ६७ वर्षीय आबे यांची एका हल्लेखोराने गोळय़ा झाडून हत्या केली होती. टोक्यो येथील निप्पॉन बुडोकन येथे मंगळवारी आबे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात वीसहून अधिक राष्ट्रप्रमुखांसह शंभरहून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जपानच्या ‘क्योडो’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोदींव्यतिरिक्त, सातशेहून अधिक परदेशी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यात अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांचाही समावेश होता. पहाटे येथे दाखल झालेल्या मोदींनी प्रथम अनेक जागतिक नेत्यांसह आबे यांना पुष्पांजली वाहिली.

हेही वाचा >>> निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात; पक्षचिन्हाबाबत सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

अंत्यसंस्कारांस उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांची पत्नी अकी आबे यांची ‘आकासा पॅलेस’मध्ये भेट घेतली. यावेळी मोदींनी श्रीमती आबे यांच्यापाशी दिवंगत आबेंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. आबे व त्यांच्या मैत्रीच्या स्मृतींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. त्यानंतर मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदींनी आबे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. भारत-जपान संबंधांतील आबे यांचे उल्लेखनीय योगदान, मुक्त आणि सर्वसमावेशक भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशाबाबत त्यांच्या दृष्टिकोनावर यावेळी चर्चा झाली. यावेळी किशिदा यांनी आबे यांच्या याबाबतच्या धोरणानुसारच भारतासह यापुढे वाटचाल केली जाईल, असे सांगितले. सहकार्य आणि मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्याचा मानस किशिदा यांनी मोदींपाशी व्यक्त केला. त्यानंतर जपानचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी भारतात परतले. परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की  दिवंगत माजी पंतप्रधान आबे यांचा वारसा, मोदी आणि पंतप्रधान किशिदा यांची वचनबद्धता भारत-जपान मैत्रीला नव्या उंचीवर नेत राहील.

‘आबेंना लाखोंच्या हृदयात कायमचे स्थान!’

मोदींनी ‘ट्वीट’ केले, की माजी पंतप्रधान आबे यांच्या अंत्यसंस्कारासारख्या प्रसंगास उपस्थित राहण्यासाठी मला यावे लागेल, याची कल्पनाही केली नव्हती. आबे हे एक महान नेते होते. भारत-जपान मैत्रीवर त्यांचा दृढ विश्वास होता. लाखो नागरिकांच्या हृदयात त्यांना कायमच स्थान राहील. आबे यांच्यासह आपले छायाचित्रही त्यांनी ट्वीट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘वैद्यकीय शिक्षण सुधारणांच्या नावे काँग्रेसने पैसे कमावले’

संबंधित बातम्या

Delhi MCD Election Result : अनेक मंत्री- सहा मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांची फौज उतरवूनही दिल्लीत भाजप पराभूत
Delhi MCD Election Result : दिल्ली महापालिका निवडणुकीतील ‘आप’च्या विजयावर मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“…हे अजिबात चालणार नाही”, सीमाप्रश्नावरून सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपाला सुनावलं; लोकसभेत खडाजंगी!
‘हजर होऊन माफी मागा’, कोर्टाने विवेक अग्निहोत्रींना फटकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचा टोला; म्हणाल्या “आता माफी फाइल्स….”
“केजरीवालांना हलक्यात घेऊ नका, अन्यथा….”, योगगुरु बाबा रामदेव यांचा भाजपाला सल्ला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुझ्या चित्रपटाच्या सेटवर येईन पण…” शाहरुख खानने आर्यनसमोर ठेवली ‘ही’ अट
सोलापुरात प्रहार संघटनेने कर्नाटक प्रवासी बसला फासले काळे; बसचालकाचा मात्र सत्कार
IND vs BAN 2nd ODI: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजचे आक्रमक रुप, जाऊन भिडला नजमुल शांतोशी, video व्हायरल
‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
मुंबईचा कायापालट करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश