सीरियात उसळलेला बंडखोरीचा आगडोंब अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाहीत़  बंडखोरांनी एकामागोमाग एक शहरे ताब्यात घेण्याचा सपाटाच लावला आह़े  गुरुवारी बंडखोरांनी पूर्व सीरियातील मयादीन हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले आह़े  बंडखोर आणि राज्यव्यवस्था यांच्याकडून होणाऱ्या हिंसाचारात आतापर्यंत ४० हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आह़े
मयादीनमध्ये बंडखोरांकडून मार खाल्लेल्या शासकीस सैन्याने देइर दझ्झोर या पूर्व सीरियातील मुख्य शहराजवळच्या लष्करी विमानतळाचा आश्रय घेतला, अशी माहिती सीरियातील मानवाधिकार निरीक्षक संस्थेने दिली़  देइर दझ्झोरच्या पूर्वेचा इराकच्या सीमेजवळचा भूभाग हा बंडखोरांच्या ताब्यात असणारा देशातील सर्वात मोठा भूभाग आहे, असे निरीक्षक संस्थेचे संचालक रमी अब्देल रहमान यांनी सांगितल़े  बंडात सहभागी न झालेल्या सीरियाच्या सैन्याकडून वृत्तसंस्थेला मिळालेल्या ई-मेलमध्ये बंडखोरांनी मयादीनजवळचे महत्त्वाचे लष्करी तळ ताब्यात घेतल्याचे नमूद करण्यात आले आह़े  तसेच बंडखोरांनी मयादीनजवळच्या तोफाखाना दलाचाही ताबा घेतला आह़े
देइर दझ्झोर हा नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाने समृद्ध असलेल्या प्रांतात सुन्नी मुस्लिमांचे प्राबल्य आहे आणि त्यांचे हितसंबंध सीमापारच्या इराकपर्यंत पोहोचलेले आहेत़  मात्र येथील बराचसा भूप्रदेश बंडखोरांच्या ताब्यात जाऊनही येथील वाळवंटात असणारे तेल आणि वायूचे साठे अद्यापही शासनाच्याच ताब्यात आहेत, असे ब्रिटनस्थित निरीक्षक संस्थेचे म्हणणे आह़े