मध्य प्रदेशातल्या हरदा जिल्ह्यातल्या एका फटाका फॅक्टरीला आग लागल्याने तिथे स्फोट झाला. या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. या सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या ठिकाणी साधारण २० ते २५ लोक अडकल्याची भीती आहे. ज्यामुळे मदत आणि बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. तसंच मुख्यमंत्री जातीने या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

ANI च्या वृत्तानुसार हरदा येथील बैरागढ फटाका कारखान्यात स्फोट झाला. या कारखान्यात काही लोक अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी SDRF ची टीम पोहचली आहे. तसंच घटनास्थळी रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. आगीचे भलेमोठे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट या ठिकाणी दिसत आहेत. तसंच लोक जिवाच्या आकांताने पळतानाही दिसत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक पोहचले असून ते आग नियंत्रणात आणण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. कारण त्यानंतरच बचावकार्य करता येणार आहे. या फॅक्टरीत फटाके असल्याने आग वारंवार भडकते आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार

हरदामध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर नर्मदापुरम आणि बैतूर या ठिकाणांहूनही एसडीआरएफचं पथक आणि मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं आहे. तसंच नर्मदापुरम या ठिकाणाहून तीन रुग्णवाहिका आणि सहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. तसंच एसडीआरएफचे १९ जवानही पोहचले आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जे लोक या घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. जे लोक या घटनेत होरपळले आहेत त्यांना भोपाळ, इंदूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.