नवी दिल्ली : दिल्लीतील सहा शाळांना बॉम्बच्या ध: मकीचा ई-मेल पाठवण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. माहिती मिळताच पोलिसांसह इतर आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचत तत्काळ शोधमोहीम सुरू केली, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. राजधानीतील सहा शाळांना गुरुवारी सकाळी ६.३५ ते ७.४८ वाजण्याच्या दरम्यान बॉम्बच्या धमकीचे फोन आले.

यामध्ये प्रसाद नगरमधील आंध्र स्कूल, बीजीएस इंटरनॅशनल स्कूल, राव मान सिंग स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल, मॅक्स फोर्ट स्कूल आणि द्वारका येथील इंद्रप्रस्थ इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चार दिवसांत शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळण्याची ही तिसरी घटना आहे.

सोमवारी, दिल्लीतील ३२ शाळांना अशाच धमक्या मिळाल्या होत्या, ज्या नंतर खोट्या असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर बुधवारी, दिल्लीतील सुमारे ५० शाळांना पुन्हा ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, ज्या नंतर अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले.