उत्तर प्रदेश सरकारने महिला व मुलांच्या संरक्षणाकडे लक्ष पुरवावे असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्य सरकारला सांगितले. त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेश सरकारने महिला व मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, कारण राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत नाही.
अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. त्यांनी शनिवारी अमेठीला भेट दिली. अमेठीच्या लोकांच्या आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. सध्याचे खासदार राहुल गांधी यांच्याकडून लोकांच्या काही अपेक्षा नाहीत अशी टीका त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
उत्तर प्रदेश सरकारवर स्मृती इराणींची टीका
उत्तर प्रदेश सरकारने महिला व मुलांच्या संरक्षणाकडे लक्ष पुरवावे असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्य सरकारला सांगितले. त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेश सरकारने महिला व मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, कारण राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत नाही.

First published on: 20-07-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani slams up government