जर्मनीची सॉफ्टवेअर कंपनी SAP वरही मंदीचा परिणाम झाला आहे. कंपनीने गुरूवारी ही घोषणा केली गेली आहे की कंपनीतून तीन हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. SAP ही कंपनी वाल्डोर्फ आधारित समूह आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर आणि क्लाऊड आधारित कॉम्प्युटर सेवा पुरवणारी कंपनी आहे.या कंपनीने आता असं म्हटलं आहे की आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आम्ही टारगेटेड रिस्ट्रक्चरींगची योजना तयार केली आहे.
AFP ने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीने २०२२ या वर्षाचा एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की SAP च्या अडीच टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. जगभरात SAP सोबत १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत.या सगळ्या संख्येची अडीच टक्के गृहीत धरली तर कंपनी साधारण ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे.
जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अशात ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेही मोठ्या कपातीची घोषणा केली. अॅमेझॉन जवळपास १८ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. कंपनीत या निर्णयाचा मोठा फटका ई कॉमर्स आणि एचआर या विभागांमध्ये काम करणाऱ्या लोकांना बसणार आहे असंही अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं.
अमेझॉनच्या सीईओने सांगितलं होतं की २०२३ च्या सुरूवातीपासून कपात होईल. याविषयी आम्ही चर्चा केली होती. अर्थात आम्ही जे कर्मचारी काढले जाणार असतात त्यांच्याशी चर्चा करत नाही. आमच्या एका सहकाऱ्याने ही माहिती बाहेर लिक केली होती असंही त्यांनी सांगितलं.