Son avenges mothers insult after 10 years Lucknow Murder Case : आईचा दहा वर्षांपूर्वी केलेल अपमान आणि मारहाण याचा एका व्यक्तीने अत्यंत निर्घृण पणे बदला घेतल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे समोर आला आहे. एखाद्या बॉलिवुड चित्रपटाला शोभावा असा घटनाक्रम पोलिसांच्या तपासात उघड आला आहे. सोनू कश्यप असे या व्यक्तीचे नाव असून तो गेल्या १० वर्षांपासून मनोज नावाच्या व्यक्तीचा लखनौच्या रस्त्यांवर शोध घेत होता.

सोनू कश्यप याने आखलेल्या या हत्येच्या योजनेत त्याच्या काही मित्रांनीदेखील मदत केली. मनोज याला ठार केल्यानंतर आपण सगळे पार्टी करूयात असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने मनोजची हत्या घडवून आणली. मनोज हा एक नारळापाणी विक्रेता होता. पण सोशल मीडियामुळे या आरोपींची ओळख पटली आणि त्यांना पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकलं. या प्रकरणातील आरोपींची नावे सोनू, रणजीत, आदिल, सलमू आणि रेहमत अली अशी आहेत.

नेमकं काय झालं होतं?

मनोज याने सोनूच्या आईला १० वर्षांपूर्वी एका वादानंतर मारहाण केली होती आणि तो त्या परिसरातून पळून गेला होता. आईचा झालेला अपमानामुळे अस्वस्थ आणि संतापलेल्या सोनूने मनोजचा शोध सुरू केला. जवळपास तीन महिन्यांपूर्वी अखेर तो त्याला शहरातील मुंशी पुलिया भागात आढळून आला. त्यानंतर त्याने बदला घेण्याची योजना आखली.

त्याने रेकी करून मनोज याच्या दिनचर्येबद्दल माहिती काढली. सोनूने मनोज याचा काटा काढण्याचा पद्धतशीर प्लॅन बनवला. पण त्याला मदतीची आवश्यकता होती. त्यानंतर त्याने त्याच्या चार मित्रांना या हत्येच्या कटात सहभागी करून घेतले, हत्या केल्यानंतर त्यांना मोठी पार्टी देईन असे आश्वासन त्याने मित्रांना दिले. २२ मे रोजी मनोज त्याचे दुकान बंद केले, तेव्हा तो एकटाच होता. ही वेळ गाठून त्यांनी लोखंडी रॉडनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला गंभीर जखमी केले. पण उपचारादरम्यान मनोज याचा मृत्यू झाला.

पार्टीने घात केला

पोलिसांकडे आरोपींना शोधण्यासाठी काहीही नव्हते. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असले तरी पोलिसांना मात्र ते सापडत नव्हते.

मात्र दुसरीकडे त्यांची योजना यशस्वी झाल्याने सोनू आणि त्याचे मित्र हे मात्र पार्टी करण्यात गुंतले होते. सोनूने त्याच्या मित्रांसाठी मोठी पार्टी आयोजित केली त्यांना भरपूर दारू पाजली आणि या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट केले. या फोटोंच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचपैकी एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ओळखू आला. आणखी शोध घेतला असता सोनूचे सोशल मीडिया प्रोफाईल देखील सापडल्या. ज्यामध्ये त्याचा हत्येच्या घटनेवेळी घातलेले तेच ऑरेंज टी-शर्ट घातलेला फोटो आढळून आला. अखेर त्यानंतर पोलिसांनी पाचही संशयितांचा माग काढला आणि त्यांना अटक केली.