समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. या परिसरात उत्तर कोरियाने लढाऊ विमानं उडवल्याचा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी उत्तर कोरियाच्या राजधानीतून क्षेपणास्र डागले, असे दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे.

उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताकडून निषेध, जपानची सुरक्षितता धोक्यात आल्याचे केलं नमूद

सीमाभागातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागातून १७० तोफगोळ्यांचा मारा करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी केला आहे. २०१८ मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामधील लष्करी कराराद्वारे तणाव निवळल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सागरी बफर झोनमध्ये हे तोफगोळे पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. हे दोन्ही देशांमधील लष्करी कराराचे उल्लंघन असल्याचे दक्षिण कोरियाचे संयुक्त दलाचे प्रमुख म्हणाले आहेत.

Russia-Ukrain War: रशियाने युक्रेनवर डागले ७५ क्षेपणास्त्र, पाच जणांचा मृत्यू, घटनेचा भीषण व्हिडीओ आला समोर

दरम्यान, ४ ऑक्टोबरला उत्तर कोरियाने मध्यम तीव्रतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्र डागले होते. त्याआधी या देशाकडून लष्करी कवायती करण्यात आल्या होत्या. उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्र चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अलिकडेच उत्तर कोरियाने जपानवर क्षेपणास्र डागले होते. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियानेही क्षेपणास्राच्या चाचण्या केल्या आहेत. या देशांनी संयुक्त लष्करी सरावही केला आहे.

Photos : युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरांवर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; मोठ्या प्रमाणात नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्राचा भारताकडून निषेध नोंदवण्यात आला होता. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले होते. या घटनेचा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतासह ११ देशांनी संयुक्त निवेदन जारी करत निषेध नोंदवला होता.