SP MP Ram Gopal Yadav comment on wing Commander Vyomika Singh : पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा बनलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल मध्य प्रदेशचे भाजपाचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्या विरोधात एफआयआर दाखर करण्यात आला आहे. यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी आता नवे विधान करत दुसर्‍या वादाला तोंड फोडले आहे. यादव यांनी भाजपावर टीका करताना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देणार्‍या इतर दोन अधिकार्‍यांच्या जातीचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. जर भाजपाला विंग कमांडर व्योमिका सिंग आणि एअर मार्शल ए.के. भारती यांची जात माहिती असती तर त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याप्रमाणे त्यांनाही शिव्या दिल्या असत्या असे यादव म्हणाले आहेत.

यादव नेमकं काय म्हणाले?

मुरादाबाद येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना समाजवादी पक्षाचे महासचिव आणि राज्यसभेचे खासदार यादव यांनी भाजपाच्या तिरंगा यात्रेवर प्रश्न उपस्थित केला. यादव म्हणाले की, “जेव्हा शस्त्रविराम झाला तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात होतं की पाकिस्तान गप्प बसणार नाही. तुम्ही पाहाता की दररोज दहशतावादी ठार होत आहेत. हे सर्व पाकिस्तानमधून येथ आहेत. पण हे लोक तिरंगा यात्रा काढत आहेत. हे फक्त निवडणुकीसाठी करत करतात… याची काय गरज आहे? आणि जर गरज आहे तर सर्व देशाला सोबत घेऊन करा, राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन करा. भाजपाचे लोक तिथं लढत होते का? ते भाजपाचे लोक होते का? लेफ्टनंट कर्नल कुरेशी यांना यांच्या एका मंत्र्यांने शिव्या दिल्या. हाय कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.”

यावेळी सपा खासदार यादव यांनी पहिल्यांदा व्योमिका सिंह यांचे नाव चुकून दिव्या सिंह असे घेतले. ते पुढे बोलताना ते म्हणाले की “व्योमिका सिंह यांच्य बद्दल कोणाला काही माहिती नाही की त्या कोण आहेत. तसेच एअर मार्शलचे जे इनचार्ज होते एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांच्याबद्दलही माहिती नव्हते नाहीतर त्यांना देखील शिव्या दिल्या असत्या.”

पुढे सिंह आणि भारती या दोन्ही अधिकार्‍यांच्या जातींचा उल्लेख करत यादव म्हणाले की, “हे तिघही (सोफिया कुरेशी यांच्यासह) पीडीए आहेत. एकाला मुस्लिम समजून शिव्या दिल्या. एकाला राजपूत समजून काही म्हटलं नाही आणि भारती यांच्याबद्दल माहिती नव्हती.” पीडीए किंवा पछडे, दलित, अल्पसंख्यांक हे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाची मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याकांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. पुढे यादव यांनी भाजपाची मानसिकता खरा असल्याचे लष्कराला मिळालेले यशाऐवजी पक्षाने केलेल्या कामाची यादी वाचून दाखवत आहेत असेही यादव यावेळी म्हणाले.

भाजपाकडून सडकून टीका

दरम्यान यादव यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विकृत जायीयवादी विचार दिसून येतात. तसचे त्यांनी सैन्य दलाला अशा चश्म्यातून पाहिले जाऊ नये असेही म्हटले आहे. “समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव एका वीरांगना मुलीला तिच्या जातीत मर्यादित करणे हे फक्त पक्षाच्या संकुचित विचारसरणीचेच लक्षण नाही तर लष्कराच्या शौर्याचा आणि देशाच्या सन्मानाचाही अपमान आहे,” असेही योगी आदित्यनाथ त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

ही तीच मानसिकता आहे जी तुष्टिकरण आणि वोट बँकेच्या राजकारणासाठी देशभक्तीचेही विभाजन करते. या विकृत जातीयवादी विचारांना जनता उत्तर देईल असेही आदित्यनाथ पुढे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.