उत्तर प्रदेशमधील आग्रा एक्स्प्रेस वेवर पुढील आठवड्यात हवाई दलाची विमाने उड्डाणाचा सराव करणार आहेत. युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हा सराव केला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा हवाई दलाची वाहतूक विमानेदेखील आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरणार आहेत. २४ ऑक्टोबरला हवाई दलाकडून हा सराव केला जाणार आहे. यंदाच्या हवाई दलाच्या सरावात एकूण २० विमानांचा समावेश असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ ऑक्टोबरला हवाई दलाची विमाने आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरणार असल्याने २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (सेंट्रल कमांड) जनसंपर्क अधिकारी गार्गी मलिक सिन्हा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ‘आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर उन्नव जिल्ह्याजवळ हवाई दलाचा सराव होईल. यामध्ये २० विमानांचा समावेश असेल. लढाऊ आणि वाहतूक अशा दोन्ही प्रकारची विमाने स्पेशल ड्रिलमध्ये सहभागी होतील. यामध्ये मिराज २०००, जॅग्वार, सुखोई ३० आणि एएन-३२ चा समावेश असेल. यातील एएन-३२ हे वाहतूक विमान आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. २४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजल्यापासून हवाई दलाचा अभ्यास सुरु होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special drill at agra expressway from 20 to 24 october by indian air force
First published on: 19-10-2017 at 20:31 IST