स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेले दोन बुकी कुख्यात दाऊद इब्राहिमसाठी काम करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली. पोलिसांनी दिल्लीतून चार आणि मुंबईतून तीन बुकींनाही ताब्यात घेतलंय.
सात बुकींपैकी जिंजू आणि ज्युपिटर अशी नावे असलेले दोघे जण दाऊदसाठी काम करीत आहेत. हे दोन्ही बुकी चंडिला याला गुडगावमधील मॉलमध्ये भेटले होते. सहा आणि सात मे रोजी श्रीशांत याने चंडिला याला बुकींची भेट घेण्यासाठी गुडगावमधील सहारा मॉलमध्ये पाठविले होते. बुकी आणि चंडिलामध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. त्याचे पुरावेही पोलिसांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळालीये.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
श्रीशांतनेच चंडिलाला बुकींना भेटण्यासाठी मॉलमध्ये पाठवले
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेले दोन बुकी कुख्यात दाऊद इब्राहिमसाठी काम करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
First published on: 16-05-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing chandila was sent by sreesanth to sahara mall in gurgaon to meet the bookies