वादग्रस्त विधानांमध्ये आघाडीवर राहणाऱ्या भाजपाते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूवरही खळबळजनक वक्तव्य केले आहे.  दुबईमध्ये लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे आता अनेक तर्कवितर्क लावले जात असून स्वामी यांनी त्यांची हत्या तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. मद्यपानाचे सेवन करत नसतानाही श्रीदेवी यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्यामुळे अनेक प्रश्नांनी डोके वर काढले आहे, असे ते म्हणाले. त्यापुढे जात दाऊद इब्राहिम व सिने अभिनेत्रींचे अनैतिक संबंध लक्षात घेता त्याकडे लक्ष द्यावं लागेल असं विधान त्यांनी केलं आहे.

बाथटबमध्ये पडून श्रीदेवी यांचा मृत्यू झालाच कसा हा मुद्दा स्वामी यांनी उचलून धरल्याचे एएनआयने प्रसिद्ध केले आहे. कोणी धक्का दिल्याशिवाय त्या बाथटबमध्ये पडल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वामी यांनी केली. त्याशिवाय हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचं काय झालं, असे म्हणत स्वामी यांनी डॉक्टरांच्या अहवालावरही प्रश्न उपस्थित केला आहे.

https://twitter.com/ANI/status/968353737625436160

स्वामी यांच्यापूर्वी अमर सिंह यांनीही श्रीदेवी या हार्ड ड्रिंकर नव्हत्या असे वक्तव्य केले होते. श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला त्यांचे पती बोनी कपूर यांच्याकडूनच समजल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच श्रीदेवी यांनी आत्तापर्यंत व्हिस्की, ब्रँडी, टकिला अशा प्रकारच्या हार्ड ड्रिंक्सना हातही लावल्याचे मी पाहिलेले नाही. लग्न समारंभात सहसा वाईन प्यायली जाते. वाईन मध्ये अल्कोहलचे प्रमाण नाममात्र असते. मात्र समारंभात जर वाईन जास्त प्यायली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात अल्कोहलचे प्रमाण आढळले असेल असेही सिंह यांनी म्हटले होते.

https://twitter.com/ANI/status/968355277232844800

श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात उलटसुलट बातम्या येत असल्या तरी आत्तापर्यंत कुणी दाऊदचं कनेक्शन जोडलं नव्हतं. मात्र, सुब्रमण्यम स्वामींनी दाऊदची सिनेसृष्टीशी असलेली घसट आणि दुबईमध्ये दाऊदचं साम्राज्य असल्याची वदंता यांची सांगड घातली आहे. दाऊदच्या बॉलीवूडमधल्या अभिनेत्रींशी अनैतिक संबंधांचा मुद्दा उपस्थित करत दाऊदच्या अँगलनं लक्ष द्यावं लागेल असं त्यांनी सुचवलं आहे. सुब्रमण्यम स्वामी वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असून त्यांच्या या विधानावरही उलटसुलट चर्चा होणार हे उघड आहे.

ट्विटरवर सुब्रमण्यम स्वामींच्यावर अनेकांनी जोरदार टीकाही केली असून स्वामींना शेलक्या शब्दांमध्ये उत्तर दिले आहे.

https://twitter.com/SabinaBasha/status/968360872589619200

https://twitter.com/I_ImranSiddiqui/status/968361494235828236

https://twitter.com/imhsharma_/status/968357180427722753

https://twitter.com/Vishj05/status/968366093587963904