गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागरी सत्कार करण्यासाठी प्रदेश भारतीय जनता पक्षाने ९ एप्रिलला येथील स्टेडियमची मागणी केली होती. मात्र, हे स्टेडियम देण्यास राज्यातील ममता बॅनर्जी सरकारने नकार दिला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  शहरातील प्रमुख उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी मोदी ९ एप्रिलला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एमसीसी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि भारत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.