पीटीआय, कोलकाता
अमेरिकेबरोबर व्यापार करार पुढील आठ ते दहा आठवड्यांत होईल, अशी अपेक्षा भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी गुरुवारी व्यक्त केली. भारत चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
नागेश्वरन म्हणाले, की ‘दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मला वाटते, की अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त करारावर आपण नक्कीच उपाय काढू शकू. अतिरिक्त कर तसाच राहिला, तर भारताची अमेरिकेला होणारी निर्यात मंदावेल.’ ते म्हणाले, ‘भारताची जीडीपी वाढ पहिल्या तीन महिन्यांत ७.८ टक्के राहिली आहे. कोव्हिडनंतर देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आहे. उत्पादन, सेवा आणि कृषी क्षेत्रातील वाढ येत्या दोन वर्षांत आर्थिक विकासात हातभार लावेल. गुंतवणूक आणि पैशांचा विनिमय यांमुळे देशाची आर्थिक वाढ सुरूच राहील.’