गेल्या काही दिवसांत भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. शुक्रवारी (३ नोव्हेंबर)मध्यरात्री नेपाळमध्ये ६.४ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. या भूकंपाने दिल्लीसह आसपासच्या परिसरात धक्के जाणवले. भूकंपाची ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.

राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासचा परिसर हादरला आहे.

mumbai coastal road marathi news, mumbai coastal road project
महाकाय तुळई समुद्रात स्थापन, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी
Return of unseasonal rains in the state
‘अवकाळी’चे पुनरागमन, राज्यातील ‘या’ भागात आज पुन्हा बरसणार…
israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
Sanjay Singh
दिल्लीत भाजपची हॅट्ट्रिक, की आप- काँग्रेसला कौल?

हेही वाचा- नेपाळमध्ये १४० भूकंपबळी सुमारे १५० जण जखमी

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. अवघ्या एक महिन्यात चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या दुर्घटनेत घरांची पडझड झाल्याची अथवा जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.