पिनाक रॉकेट लाँचर ( Pinaka rocket Launcher ) हे स्वदेशी बनावटीचे रॉकेट लाँचर असून १९९८ नंतर लष्करात दाखल झाले आहे. ४४ सेकंदात ४० किलोमीटरपर्यंत मारा करु शकणारी १२ रॉकेट डागण्याची क्षमता ही सुरुवातीला पिनाकमधे होती. वेळोवेळी यामध्ये बदल करत याची गुणवत्ता, अचुकता यामधे बदल करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून अधिक दूरवर मारा करणाऱ्या नवे पिनाक ( Pinaka Extended Range) हे विकसित करण्यात आलं आहे.

या नव्या पिनाकच्या चाचण्या राजस्थान इथे एका अज्ञात टेस्ट रेंजच्या ठिकाणी गेले तीन दिवस चाचण्या सुरु होत्या. यामध्ये वेगवेगळ्या अंतरावर मारा करु शकणाऱ्या पिनाक रॉकेटच्या चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व चाचण्या समाधानकारक असून नवे पिनाक आता लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज झालं असल्याचं केंद्र सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे. या नव्या पिनाकमुळे लष्कराच्या मारक क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

नवे पिनाक रॉकेट लाँचर कसं आहे ?

नव्या पिनाक रॉकेट लाँचरमध्ये १२ रॉकेट्स हे ७० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर, जास्तीत जास्त ९० किलोमीटरपर्यंत मारा करु शकतात. नव्या पिनाकमध्ये रॉकेटची अचुकता आणि संहार करण्याची क्षमता ही वाढवण्यात आली आहे. तसंच गायडेड ( नियंत्रित ) रॉकेटही यामधून डागले जाऊ शकतात, म्हणतेच जमिनीवर आघात होतांना काहीशी दिशा बदलण्याची क्षमता या गायडेड रॉकेटमधे आहे. त्यामुळे नवे पिनाक रॉकेट लाँटर हे अधिक घातक ठरणार आहे.

नव्या पिनाकची यंत्रणा आणि त्यामधील अत्याधुनिक रॉकेट हे पुण्यातील Armament Research & Development Establishment (ARDE) आणि High Energy Materials Research Laboratory (HEMRL) या डीआरडीओ (DRDO) च्या संस्थांनी विकसित केलं आहे