आगामी वर्षात होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण गरम होण्यास सुरूवात झाली आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तर, दुसरीकडे सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला हटवण्यासाठी आता समाजवादी पार्टीने भाजपाचे जुने मित्र आणि एनडीएचा भाग राहिलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीशी हात मिळवणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजवादी पार्टी व सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणूक भाजपा विरोधात एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीकडून तसे अधिकृत ट्विट देखील करण्यात आले आहे. तर, सुहेलदेव यांनी देखील माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली आहे.

“ वंचित, शोषित, मागास, दलित, महिला, शेतकरी, तरूण, प्रत्येक कमकुवत वर्गाची लढाई समाजवादी पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी मिळून लढवतील. ‘सपा और सुभासपा आए साथ, यूपी में भाजपा साफ!’ ” असं समजावादी पार्टीकडून ट्विट करण्यात आलं आहे.

तर, “ उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सत्तेवरून हटवण्यासाठी सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी एकत्र आल्या आहेत. मी अखिलेश यादव यांना २७ ऑक्टोबर रोजी मऊ येथे होणाऱ्या महापंचायतीसाठी आमंत्रित केले आहे. ” असं सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी सांगितलं आहे.

ओम प्रकाश राजभर हे योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र नंतर मतभेदामुळे त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. शिवाय, त्यांनी आपल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीला देखील एनडीएपासून वेगेळे केले. त्यानंतर आता आगामी विधानसभा निडणुकीसाठी समाजवादी पार्टीबरोबर हात मिळवणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suheldev bharatiya samaj party and samajwadi party have come together msr
First published on: 20-10-2021 at 16:51 IST