अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील हेलमंद प्रांतातील पोलीस प्रशिक्षण तळानजीक एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकाने भरलेल्या वाहनाचा स्फोट केल्यामुळे किमान ३ पोलीस ठार झाले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
नाद अली जिल्ह्य़ातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला लक्ष्य करून हा हल्ला झाला. यात दोन नागरिकांसह इतर १२ लोक जखमी झाले, असे प्रांतिक राज्यपालांचे प्रवक्ते ओमर झ्वाक यांनी सांगितले. तालिबानचे प्रवक्ते कारी युसूफ अहमदी यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.
तालिबान अनेकदा रस्त्यालगत पेरलेले बॉम्ब, छुपे हल्ले आणि आत्मघातकी हल्ले याद्वारे देशभरातील अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांविरुद्ध हल्ले करत असते. अतिरेक्यांना निधी पुरवण्यासाठी अमली पदार्थाच्या तस्करीच्या मार्गाना सुरक्षा पुरवण्यासाठी अलीकडच्या काळात अफूचे उत्पादन करणाऱ्या प्रांतात ही संघटना सक्रिय झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide car bomb kills 3 in afghanistan
First published on: 15-05-2016 at 00:05 IST