भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून मंगळवारी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे अनुभवी अंतराळवीर अंतराळात जाणार होते. मात्र ही मोहीम रद्द झाली आहे. सुनीता विल्यम्स यांची ही तिसरी अंतराळ मोहीम ठरली असती. मात्र ती मोहीम आता रद्द झाली आहे.

नेमकं काय घडलं?

सुनीता विल्यम्स बुच विल्मोर यांच्यासह अंतराळ मोहिमेसाठी बोइंग स्टारलाइनरने अंतराळात झेपावणार होत्या. मात्र लाँचिंगच्या काही तास आधी तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. आता ही मोहीम पुन्हा कधी राबवली जाईल याबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सुनीता विल्यम्स आज तिसऱ्यांदा अंतराळात झेपावणार होत्या. मात्र ही मोहीम रद्द झाली आहे. याआधी सुनीता विल्यम्स २००६ आणि २०१२ या वर्षांमध्ये अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातल्या मोहीमेचे ३२२ दिवस पूर्ण केले आहेत.

Indian-origin astronaut Sunita Williams
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी ८.०४ वाजता फ्लोरिडातील केप कॅनाव्हरलच्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स-४१ वरून अॅलटस व्ही प्रक्षेपकांवर स्टारलाइनर अंतराळयान प्रक्षेपित केले जाणार होते. या यानातून सुनिता विल्यम्स आणि विल्मोर अंतराळात झेपावणार होते. स्टारलाइनर अंतराळयानावर सुनीता प्रशिक्षण घेत होत्या. यानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे मोहीम प्रलंबित होती, म्हणून त्या आज अंतराळात झेपावणार होत्या. मात्र ही मोहीम रद्द झाली आहे.

याआधी जुलै २०२२मध्ये स्टारलाइनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते, मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.विल्यम्स यांच्या आधीच्या मोहिमा डॉ. दीपक पांड्या आणि बोनी पांड्या यांच्या पोटी जन्मलेल्या सुनीता विल्यम्स यांची निवड १९९८ मध्ये नासामध्ये झाली आहे. त्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत. २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीता विल्यम्स यांचा परिचय

सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतरळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानंही उडवली आहेत. त्यांनी ३० प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे. सुनीत विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं. मायकेल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते.