राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक माहिती अहवाल पोलीस स्टेशनला नोंदणीनंतर २४ तासांत संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्या. दीपक मिश्रा व न्या. सी. नागप्पन यांनी सांगितले, की अवघड भागातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक माहिती अहवाल ७२ तासांत अपलोड करावेत, कारण तेथे इंटरनेटचा वेग कमी असतो. बंडखोरी, दहशतवाद किंवा लैंगिक गुन्हय़ांबाबतचे संवेदनशील प्रकरणातील प्राथमिक माहिती अहवाल अपलोड करण्यातून सूट देण्यात आली आहे.

आरोपींना प्राथमिक माहिती अहवाल अपलोड न केल्याच्या सबबीचा फायदा मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सुनावणीत राज्यांनी प्राथमिक माहिती अहवाल अपलोड करण्यासाठी ४८ तासांची मुदत मागितली होती, पण न्यायालयाने २४ तासांची मुदत दिली आहे. यूथ लॉयर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने दाखल केलेल्या लोकहिताच्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.

Mahavitarans Go Green scheme to save money on electricity bills
वीज देयकांत पैसे वाचवायचे असतील तर ‘ही’ आहे योजना…
Green shades over traffic signals to beat the heat in Puducherry Video Viral
उन्हापासून वाचण्याचा हटके जुगाड, ट्रॅफिक सिग्नलवर….; Viral Video पाहून पुणेकर म्हणे,”आम्हालाही ही सुविधा द्या”
scolarship, mahadbt Scholarship, Deadline Extended for Government Scholarship, Deadline Extended for mahadbt Government Scholarship, Government Scholarship, maharashtra government Scholarship, Scholarship for students,
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ
Nagpur rural rto marathi news, Nagpur rto, Nagpur rto marathi news
नागपूर ग्रामीण आरटीओची २०१९ पासूनच्या कागदपत्रांची तपासणी, काय आहे कारण जाणून घ्या…
important section of right to information act in indian constitution
संविधानभान : हम जानेंगे, हम जियेंगे!
Creation of a special website for the deaf
मुंबई : कर्णबधिरांसाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती
VSSC Online Application 2024
ISRO मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती! ५६ हजारपर्यंत मिळू शकतो पगार, त्वरित करा ऑनलाईन अर्ज
Mumbai Municipal Commissioner, bmc commisioner, Warns Shops Without Marathi Nameplates, Property Tax Equivalent Fine, marathi news, mumbai news, bhushan gagrani, marathi name plates, marathi language in Mumbai, marathi news, Mumbai news,
मुंबई : मालमत्ता कराइतका दंड आकारण्याचा इशारा देताच दुकानांवर झळकले मराठीत नामफलक

दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात २४ तासांत प्राथमिक माहिती अहवाल अपलोड करण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने काही सुधारणांसह हा आदेश मंजूर केला.