Supreme Court cancels bail of actor darshan in renukaswamy murder case : सर्वोच्च न्यायालयाने कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याचा जामीन गुरूवारी रद्द करत त्याला मोठा धक्का दिला आहे. दर्शन याला त्याचा फॅन रेणुकास्वामी याच्या हत्या प्रकरणात शिक्षा झाली होती. या अभिनेत्यावर २०२४ मध्ये हत्येचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर त्याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेक जण आरोपी आहेत, ज्यामध्ये पवित्रा गौडाचाही समावेश आहे. दर्शन याला दिलासा देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात गंभीर कायदेशीर त्रुटी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करताना म्हटले आहे.

जून महिन्यात रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर, उच्च न्यायालयाने १३ डिसेंबर दर्शन आणि सह-आरोपी प्रदूश राव, जगदीश उर्फ जग्गू, अनु कुमार, लक्ष्मण एम आणि नागराजू के यांना जामीन मंजूर केला होता

 सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करताना म्हटले की, “हे स्पष्ट आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशात गंभीर कायदेशीर त्रुटी आहेत. दर्शन याला सोडण्याचे कोणतेही वैध कारण नाही. उच्च न्यायालयाचा आदेश मनमानी वाटतो. उच्च न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब पाहिले, जे की ट्रायल कोर्टाचे काम आहे. इतक्या गंभीर प्रकरणात मुद्द्यांची तपासणी केल्याखेरीज जमीन देणे चूक आणि गैर आहे.”

जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावण्यात आला आहे. न्या. जे बी पारडीवाला आणि न्या. आर महादेव यांच्या खंडपीठाने जामीन रद्द करम्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर हा निर्णय दिला.

सर्वोच्च नयायालयाने म्हटले की, या प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या न्यायिक शक्तींचा गैरवापर झाला आहे. एका कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अशी चूक करणे स्वीकार केले जाऊ शकते मात्र उच्च न्यायायलाच्या न्यायाधीशांनी अशी चूक करणे योग्य नाही. न्या. पारडीवाला यांनी निर्णय दिल्याबद्दल न्या. आर महादेवन यांचे कौतुक केले आणि म्हणाले की, हा निर्णय एक कठोर संदेश देतो, आरोपी कोणीही असो, तो कायद्याच्या वर नाही.

तसेच न्या. पारडीवाला यांनी इशाराही दिला की ज्या दिवशी आम्हाला कळेल की आरोपींना जेलमध्ये फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली जात आहे, तर पहिले पाऊल सर्व अधिकाऱ्यांसह अधीक्षकांना निलांबीत करणे हे असेल. न्या. पारडीवाला यांनी राज्य सरकारला इशारा देताना सांगितले की जर राज्या सरकारच्या विरोधात एखादा फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळाला की व्हिआयपी सुविधा मिळत आहेत तर तर सर्वात आधी तुम्हाला सांगितले जाईल.

याबरोबरच न्या. पारडीवाला यांनी या निर्णयाची प्रत देशातील सर्व उच्च न्यायालयांना आणि राज्य सरकारांना पठण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरण काय आहे?

कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला त्याचा फॅन रेणुकास्वामी याच्या हत्येच्या प्रकरणात ११ जून २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. तो जवळपास ७ महिने तुरुंगात बंद राहिला. त्यानंतर १३ डिसेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने तयाला मेडिकलच्या आधारावर जमीन दिला होता. त्यानंतर हे प्रकरण कायदेशीर प्रक्रियेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीनाची समीक्षा करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला निराधार म्हटले आहे.

कोण आहे दर्शन?

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपा याने १९९० मध्ये करियरला सुरूवात केली होती. त्याचे खरे नाव हेमंत कुमार आहे. अनेक टीव्ही शोमध्ये काम केलेल्या दर्शन याला २००२ मध्ये मॅजेस्टिक चित्रपटापासून खाळख मिळाली, त्यानंतर त्याने करिया, गज, नवग्रह, सारथी, बुलबुल, यजमान इत्यादी चित्रपटांत काम केले.