बालगुन्हेगाराची नव्याने व्याख्या करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. अत्यंत गंभीर गुन्ह्य़ांतील कोणत्या आरोपीला बालगुन्हेगार म्हणावे याचा निर्णय बालगुन्हेगार न्याय मंडळाऐवजी फौजदारी न्यायालयाने घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी आणि दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील बालगुन्हेगाराच्या पालकांनी केलेल्या याचिका सरन्यायाधीश पी. सदाशिवम, न्या. रंजन गोगोई आणि न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या पीठाने फेटाळून लावल्या.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
बालगुन्हेगारी व्याख्येबाबतच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या
बालगुन्हेगाराची नव्याने व्याख्या करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. अत्यंत गंभीर गुन्ह्य़ांतील कोणत्या आरोपीला बालगुन्हेगार म्हणावे याचा निर्णय

First published on: 29-03-2014 at 06:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court refuses to lower age of juvenile