नीट परीक्षा २०२२ (NEET-PG 2022) पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. “परीक्षा आयोजित करण्यात येणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांची संख्या कमी होईल.” असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटाने केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहले होते. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांकडून आंदोलनही करण्यात येत आहे.

नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
२१ मे २०२२ ला नीट परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली होती. कांऊनसिलिंगच्या दरम्यान ही परीक्षा येत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

सरकारने जारी केलेल्या वेळापत्रकांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले, की परीक्षा पुढे ढकलल्याने “अराजकता आणि अनिश्चितता” निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल. “विद्यार्थ्यांच्या दोन श्रेणी आहेत. एक जे पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत आणि दुसरीकडे दोन लाख सहा हजारांहून अधिक उमेदवार आहेत ज्यांच्यावर परीक्षा पुढे ढकल्याचा परिणाम होईल. कोरोनामुळे परीक्षांचे विस्कटलेले वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देश यातून सावरत असताना सरकारने दिलेल्या वेळापत्रकाचे पालन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसह आंदोलन
वकील आशुतोष दुबे आणि अभिषेक चौहान यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे, की “याचिकाकर्ते हे डॉक्टर आहेत. जे देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये इंटर्नशिप करत आहेत. याचिकाकर्ते २१ मे रोजी होणार्‍या नीट परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. तर ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी २१ मे २०२२ रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत ऑनलाइन आणि ऑफलाइन आंदोलन करत आहेत.

नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
२१ मे २०२२ ला नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केली होती. कांऊनसिलिंगच्या दरम्यान ही परीक्षा येत असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले, की परीक्षा पुढे ढकलल्याने “अराजकता आणि अनिश्चितता” निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल. “विद्यार्थ्यांच्या दोन श्रेणी आहेत. एक जे पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत आणि दुसरीकडे दोन लाख सहा हजारांहून अधिक उमेदवार आहेत ज्यांच्यावर परीक्षा पुढे ढकल्याचा परिणाम होईल. कोरोनामुळे परीक्षांचे विस्कटलेले वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देश यातून सावरत असताना सरकारने दिलेल्या वेळापत्रकाचे पालन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

परिक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसह आंदोलन
वकिल आशुतोष दुबे आणि अभिषेक चौहान यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे, की “याचिकाकर्ते हे डॉक्टर आहेत. जे देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये इंटर्नशिप करत आहेत. याचिकाकर्ते २१ मे रोजी होणार्‍या नीट परीक्षेला बसण्याची इच्छा आहे. तर ४० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी २१ मे २०२२ रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत ऑनलाइन आणि ऑफलाइन आंदोलन करत आहेत.