दिल्लीमधील पाचवर्षीय बालिकेवरील बलात्काराविरोधात निदर्शने करणाऱया मुलींवर बळाचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना फटकारले. निदर्शने करणाऱया मुलींवर बळाचा वापर का केला, याचा खुलासा करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या प्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली.
पूर्व दिल्लीतील बालिकेवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये गेल्या शुक्रवारपासून महिला व विद्यार्थी संघटना तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानांसह ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे भडकलेले सर्वसामान्य नागरिक उग्र निदर्शने करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. निदर्शने करणाऱया एका महिलेवर पोलिस अधिकाऱयाने बळाचा वापर केला होता. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2013 रोजी प्रकाशित
महिला निदर्शकांवर बळाचा वापर का केला? सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
दिल्लीमधील पाचवर्षीय बालिकेवरील बलात्काराविरोधात निदर्शने करणाऱया मुलींवर बळाचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना फटकारले.
First published on: 25-04-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court seeks explanation from delhi police chief on use of force against young girls demonstrating against rape