गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी रुपये परत न केल्यावरून खटल्याला सामोरे जात असलेले सहारा समूहाचे प्रवर्तक सुब्रतो रॉय यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. मूळ याचिकेला बगल देत आपण वेगवेगळ्या न्यायालयांत धाव घेत न्याययंत्रणेचा गैरवापर करीत आहात, असे न्यायालयाने सुनावले.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबाबत ‘सेबी’ने दाखल केलेल्या याचिकेस तसेच समूहाचे प्रवर्तक रॉय यांच्यासह दोन संचालक अशोक रॉय चौधरी आणि रविशंकर दुबे यांच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी सेबीने बजाविलेल्या नोटिशीला दाद न दिल्याबद्दल खंडपीठाने रॉय यांना फटकारले. सहाराच्या दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेवर टांच आणण्याचा आदेश खंडपीठाने दिल्यानंतर सहाराने अलाहाबाद न्यायालयात याचिका दाखल केल्याकडे सेबीने लक्ष वेधता खंडपीठाने तीव्र आक्षेप घेतला आणि आपल्या चुकीची दुरुस्ती करण्यास सहाराला बजावले.
आयपीओ बंद
साडेतीन वर्षांपूर्वी सादर केलेल्या ३,५०० कोटी रुपयांच्या भागविक्री मंजुरीची सहाराची ‘फाइल’ सेबीने अखेर बंद केली आहे. काही गोष्टींचे स्पष्टीकरण सहाराने केले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
‘सहारा’ला दणका
गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी रुपये परत न केल्यावरून खटल्याला सामोरे जात असलेले सहारा समूहाचे प्रवर्तक सुब्रतो रॉय यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. मूळ याचिकेला बगल देत आपण वेगवेगळ्या न्यायालयांत धाव घेत न्याययंत्रणेचा गैरवापर करीत आहात, असे न्यायालयाने सुनावले.
First published on: 23-04-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suprime court rebuked to sahara