गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. हेही वाचा - “राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला अन् शिंदे-फडणवीस सरकारने…”; माहीम कबरीच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया २०१९ मध्ये कर्नाटच्या कोलार येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याविरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. आज याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. हेही वाचा - माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल! दरम्यान, आज राहुल गांधी स्वत: सुरत न्यायालयात हजर होते. यावेळी त्यांनी ''मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही'', असे न्यायालयाला सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्यांना भादंविच्या कलम ५०४ अन्वये दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावणी तसेच त्यांना जामीनही मंजूर केला.