scorecardresearch

माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता.

raj thackeray video on mahim majar
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – Mahim Dargah : राज ठाकरेंनी दाखवलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर माहिम दर्गा ट्रस्टची प्रतिक्रिया; “ती जागा ६०० वर्षे जुनी, आम्ही तिथे…”

बुधवारी रात्री निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी (मुंबई शहर) हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचं पथक याठिकाणी पोहोचलं आहे. तसेच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा- “धन्य ते हास्यसम्राट अन् धन्य त्यांची…”; राज ठाकरेंच्या भाषणावर आमदार अमोल मिटकरींची खोचक टीका!

दरम्यान, याप्रकरणी माहीम दर्गा ट्रस्टकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी असंही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 08:49 IST

संबंधित बातम्या