तीन विवाहित बहिणी, दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू

राजस्थानच्या जयपूर शहरातील दुडु भागात दोन बालकासह एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह शनिवारी एका विहिरीत आढळले.

death
(संग्रहीत छायाचित्र)

पीटीआय, जयपूर : राजस्थानच्या जयपूर शहरातील दुडु भागात दोन बालकासह एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह शनिवारी एका विहिरीत आढळले. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतांमध्ये काली देवी (२७), ममता मीणा (२३) व कमलेश मीणा (२०) या बहिणी, हर्षित (४) आणि वीस दिवसांच्या एका बालकाचा समावेश आहे.

या तिन्ही बहिणींचा विवाह एकाच कुटुंबात झाला होता आणि सासरचे लोक त्यांचा छळ करत होते, असा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  मीनू का मोहल्ला भागात राहणारे हे कुटुंब बुधवारी बाजारात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी ते हरवल्याची भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावली होती, तसेच पोलिसांत तक्रारही केली होती. मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर ते बाहेर काढून शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suspected death of three married sisters two children crime police ysh

Next Story
‘ऑल दॅट ब्रिद्स’ कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी