केंद्रीय मंत्री व्ही़ नारायणस्वामी यांच्या येथील निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या कारच्या खाली पाइपबॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आह़े बॉम्ब शोधक- नाशक पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अज्ञात व्यक्तीने पेरलेल्या या स्फोटकांची तपासणी सुरू केली आहे, असे पोलीस महासंचालक पी़ कामराज यांनी सांगितल़े तोटीसारख्या उपकरणाने दोन तारा जोडलेल्या आणि दोन्हीकडून बंदिस्त केलेल्या येथे आढळल्या आहेत़ परंतु, पुढच्या कारवाईसाठी बॉम्ब शोधक- नाशक पथकाच्या अहवालाची वाट पाहात असल्याचेही कामराज यांनी सांगितल़े याबाबत स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
नारायणस्वामी सध्या दिल्लीत आहेत़ त्याच्या वाहन चालकाने पहाटेच्या वेळी गाडीखाली ही संशयास्पद वस्तू पाहिली़ केंद्रशासित प्रदेशात समाजकंटकांच्या कारवाया सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे नारायणस्वामी याबाबत म्हणाल़े दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी येथे निदर्शनेही केली़
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
केंद्रीय मंत्र्याच्या गाडीखाली पाइपबॉम्ब
केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांच्या मोटारीखाली संशयास्पद स्फोटक वस्तू आढळल्याने बुधवारी खळबळ उडाली.
First published on: 30-01-2014 at 12:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspected explosive device found under narayanasamys car