मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे. डहाणूजवळील चारोटी येथे हा टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० जण जखमी असून यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. सर्व जखमींना कासा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या ही आग अटोक्यात आली असून पुन्हा आग लागू नये म्हणून कुलिंग प्रोसेसिंग सुरू आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही दिशेच्या वाहनांना घटनास्थळापासून 100 मिटरवर अंतरावरच थांबवण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2014 रोजी प्रकाशित
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकरला आग; सात जणांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे. डहाणूजवळील चारोटी येथे हा टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली.

First published on: 22-03-2014 at 05:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker blast on mumbai ahemdabad highway