जागतिक योग दिवस मोठ्या तयारीनीशी साजरा करण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱया कार्यक्रमात जगातील १०० देशांच्या प्रतिनिधींना एकाच छताखाली आणून योग साधना करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. उद्दीष्ट साध्य झाल्यास यातून जागतिक विक्रमाचा दावा देखील करण्यात येणार आहे.
२१ जून रोजी राजपथावर सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणाऱया अर्ध्यातासाच्या योग शिबिरात ४० हजार जण एकाच वेळी योगासने करणार आहेत. यासोबतच जगातून जवळपास १०० देशांचे प्रतिनिधी देखील या योग शिबीराला उपस्थित राहतील असे लक्ष्य कार्यक्रमाच्या आयोजकांनी ठेवले आहे. जगातील १०० देशांचे राष्ट्रीयत्व असलेले लोक एकाच ठिकाणी जमून योगासने केल्याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये करण्याचा दावा यावेळी केला जाणार आहे. आयुष मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून जमणाऱया परदेशी प्रतिनिधींसह स्वसंसेवकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेहरु युवा केंद्र संघटनच्या(एनवायकेस) खांद्यावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2015 रोजी प्रकाशित
मोदींच्या योग दिनाला १०० देशांचे प्रतिनिधी; जागतिक विक्रमाचा मानस
जागतिक योग दिवस मोठ्या तयारीनीशी साजरा करण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱया कार्यक्रमात जगातील १०० देशांच्या प्रतिनिधींना एकाच छताखाली आणून योग साधना करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.

First published on: 05-06-2015 at 06:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Target for pm narendra modi yoga day event representatives from 100 countries