त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी ट्वीट केलेल्या एका फोटोमुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. तथागत रॉय यांनी भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलास विजयवर्गीय यांची तुलना श्वानाशी केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. हा फोटो ट्वीट करताना तथागत रॉय यांनी ‘पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा व्होडाफोन’ अशी कॅप्शन दिली आहे. व्होडाफोनने आपल्या जुन्या जाहिरातींमध्ये श्वानाचा (pugs) वापर केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालमध्ये इतका मोठा पराभव झाल्यानंतरही कैलास विजवर्गीय भाजपाचे प्रभारी आहेत याबद्दल एका युजरने म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना तथागत रॉय यांनी हा फोटो ट्वीट केला.

“गर्दीतील नेते असणाऱ्या कैलास विजयवर्गीय यांचा अद्याप कोणीही उल्लेख केलेला नाही. वरिष्ठ नेत्यांसोबत असणाऱ्या घनिष्ठ सबंध कदाचित त्यांना वाचवत आहेत. आश्चर्य म्हणजे ते अद्यापही भाजपाचे प्रभारी आहेत. भाजपा कोलकात्यात अद्यापही दिशाहीन आहे,” असं युजरने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला. टीएमसीने २९४ पैकी २१३ जागांवर विजय मिळवत भाजपाला मोठा धक्का दिला. भाजपा फक्त ७७ जागांवर विजय मिळवू शकला.

या पराभवासाठी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासहित कैलास विजयवर्गीय, शिवप्रकाश आणि अरविंद मेनन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या चौघांनी मिळून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा नाव चिखलातून ओढत नेत सर्वात मोठ्या पक्षाची बदनामी केली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तृणमूलमधून येणाऱ्या कचऱ्याला ते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये बसून तिकीट वाटत होते असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tathagata roy tweets image comparing kailash vijayvargiya to a dog sgy
First published on: 26-10-2021 at 10:29 IST