कर्नाटक राज्याच्या गदग जिल्ह्यातील हदलिन नामक गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका शिक्षकाने चौथीतील विद्यार्थ्यासोबत क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. आरोपी शिक्षकानं संबंधित विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण करत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं आहे. या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

मुथप्पा असं आरोपी शिक्षकाचं नाव असून तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी मुथप्पा सरकारी मॉडेल उच्च प्राथमिक शाळेत शिकवत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्याला पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं. भरत बरकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

विशेष म्हणजे मृत विद्यार्थी भरत याची आई गीता बरकरही त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. घटनेच्या वेळी त्यांनी संतप्त शिक्षकाच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, झालेल्या झटापटीत गीता बरकरही जखमी झाल्या आहेत. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.

हेही वाचा- Allahabad University Violence : अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; वाहनांची जाळपोळ, तोडफोडीमुळे एकच गोंधळ

आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आरोपी शिक्षक मुथप्पा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.