scorecardresearch

Allahabad University Violence : अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; वाहनांची जाळपोळ, तोडफोडीमुळे एकच गोंधळ

शुल्क वाढीच्या विरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले

Allahabad University Violence : अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; वाहनांची जाळपोळ, तोडफोडीमुळे एकच गोंधळ
हिंसाचारात विद्यापीठ परिसरात जाळपोळ झाली.

Allahabad University: अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी शुल्क वाढीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या दरम्यान जाळपोळ आणि तोडफोडही मोठ्याप्रमाणावर झाली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार प्रयागराजमध्ये अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शुल्क वाढीच्या विरोधात आंदोलन केले. ज्यानंतर विद्यापीठ परिसरात हिंचासाचार उफाळला.

प्राप्त माहितीनुसार विद्यापीठातील काही सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक केली आणि त्यांना मारहाणही केली, ज्यामुळे विद्यार्थी भडकले.

परिस्थिती नियंत्रणात –

उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी या हिंसाचाराच्या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासन सातत्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद –

टाईम्स ऑफ इंडियाने या हिंसाचाराबाबत माहिती देताना सांगितले आहे की, अलाहाबाद विद्यापीठातील कला परिसर आणि सभोवताली आज(सोमवार) विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी एका माजी विद्यार्थी नेत्याशी कथितरित्या गैरवर्तणूक केली आणि त्याला माराहाणही केली. ज्यानंतर हिंसाचाराची घटना घडली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 20:10 IST

संबंधित बातम्या