महिला शिक्षिकेने शाळेच्या मैदानात एका विद्यार्थ्यासह शरीर संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. द इंडिपेन्डने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ही घटना अमेरिकेत घडली आहे.

अमेरिकेतल्या पुलास्की काऊंटतली घटना

समोर आलेल्या माहितीनुसार पुलास्की काऊंटीमधील लॅकी महाविद्यालयात गणिताची शिक्षिका आहे. हेली क्लिफ्टन-कारमॅक या शिक्षिकेला पोलिसांनी ५ जानेवारी रोजी अटक केली आहे. बलात्कार, विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध आणि विनयभंग या आरोपांखाली शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या शिक्षिकेने ज्या विद्यार्थ्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले त्यानेच ही माहिती पोलिसांन दिली.

अल्पवयीन मुलानेच पोलिसांना प्रकार

हेली क्लिफ्टन कारमॅक ही ज्या महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यकरत आहे तिथेच तिने एका अल्पवयीन विद्यार्थ्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांना लक्ष ठेवायला सांगून तिने शाळेतल्या मैदानातच या मुलासह सेक्स केला. ती सगळ्याच मुलांशी जवळीक साधत होती असंही या तक्रार करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाची शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि इतर व्यक्तींनाही कल्पना होती असाही दावा करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी शिक्षिकेला अटक केल्यानंतर तिचा फोन जप्त केला. तसंच पुढील तपास करण्यासाठी तिच्या फोनचा पासवर्ड पोलीस मागत होते. मात्र तिने पासवर्ड दिला नाही. अखेर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन या शिक्षिकेचा फोन अनलॉक केला. त्यावेळी तिच्या मेसेजमध्ये विद्यार्थ्यांशी जे चॅटिंग केलं ते आढळून आलं आहे. तसंच विद्यार्थ्यासह असलेले तिचे शरीर संबंधही उघड झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास सुरु केला आहे.