‘फेसबुक’ या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइटवर एका तरुणीचे नग्न छायाचित्र तिच्याच जिवलग मैत्रिणीने प्रसिद्ध केले. मात्र संतापलेल्या या तरुणीने पाठीवर तब्बल ६५ वार करून या मैत्रिणीची हत्या केली. ही घटना लंडनमध्ये घडली़
इरंडी एलिझाबेथ ग्वातिरेझ आणि अॅनिअल बाएझ या १६ वर्षीय तरुणींची जिवलग मैत्री होती. लंडनमध्ये राहणारे हे दोघेही एकमेकांशी अनेकदा ‘फेसबुक’वरून संवाद साधत. एके दिवशी अॅनिअलने इरंडीचे नग्न छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध केले. त्याचा राग आल्याने तिने त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती.
‘तू केलेल्या कृत्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, म्हणजे मी शांत आहे, असा तुझा समज झाला असेल. मात्र माझी अशी इच्छा आहे की तुझा एकदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा खून करावा,’ असे इरंडीने अॅनिअलला ट्विट केले.
इरंडीच्या धमकीला अॅलिअल जोरात हसली आणि तिने तिला तडजोड करण्यासाठी आपल्या घरी बोलावले. या भेटीत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि इरंडीने अॅनिअलच्या पाठीत चाकूचे ६० वार केले, असे पोलिसांनी सांगितले. या हत्येत आपला हात नसल्याचे इरंडीने भासवले होते. मात्र अॅलिअलच्या अंत्ययात्रेसमयी पोलिसांनी तिला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2014 रोजी प्रकाशित
फेसबुकवर नग्न छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या मैत्रिणीची तरुणीकडून हत्या
‘फेसबुक’ या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइटवर एका तरुणीचे नग्न छायाचित्र तिच्याच जिवलग मैत्रिणीने प्रसिद्ध केले. मात्र संतापलेल्या या तरुणीने पाठीवर तब्बल ६५ वार करून या मैत्रिणीची हत्या केली.

First published on: 02-04-2014 at 12:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teenage girl stabs her best friend 65 times after she posted their naked photos on facebook