अल्पवयीन मुलीवर तीन ते चार जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला कॅनॉट प्लेस भागामध्ये फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीमध्ये घडली. पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशमधील राहणारी आहे.
कॅनॉट प्लेसमधील एन ब्लॉकच्या वाहनतळाजवळ रविवारी सकाळी पीडितेला फेकून देण्यात आले. पोलीसांनी तिला आरएमएल रुग्णालयात दाखल केले असून, वैद्यकीय चाचण्यांनुसार तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घरातील व्यक्तींसोबत वाद झाल्याने पीडित मुलगी रेल्वेने उत्तर प्रदेशातून पळून दिल्लीला आली होती. दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तीन ते चार जणांनी तिला पळवून नेले. यानंतर त्यांनी सिंदिया हाऊस परिसरात तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला कॅनॉट प्लेस भागामध्ये फेकून देण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
बाराखांबा रस्ता परिसरात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. कॅनॉट प्लेस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांचे चित्रीकरणही पोलीस तपासत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teenaged girl gang raped in delhi
First published on: 11-12-2013 at 02:13 IST