तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव लवकरच राष्ट्रीय पक्षाची स्थापना करणार आहेत. पक्षाचे धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली आहे. राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या प्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. “विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याबाबत एकमत झाले आहे”, असे निवेदन राव यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; गुलाम नबी आझाद म्हणाले, “येत्या १० दिवसांत…!”

JP Nadda Buldhana, JP Nadda,
जे पी नड्डा म्हणतात, “इंडिया आघाडी म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविणारी…”
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
liability determination order
सांगली जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारातील ५० कोटींची जबाबदार निश्चितेचे आदेश
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल

के. चंद्रशेखर राव यांनी सातत्याने भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही महिन्यात विरोधकांमध्ये ऐक्य साधण्यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात उतरेल, असे काही दिवसांपूर्वी राव यांनी जाहीर केले होते.

“फेविकॉलने नितीश कुमार यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर केले पाहिजे, कारण…”, प्रशांत किशोर यांचा खोचक टोला!

तेलंगणा राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांसह राज्यातील ज्येष्ठ नेते, निवृत्त न्यायाधीशांकडून राष्ट्रीय पक्षाची स्थापना करण्याबाबत के. चंद्रशेखर राव यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाला कडवी टक्कर देण्यासाठी राव यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याबाबत तेलंगणातील विविध स्तरांमधून आग्रह करण्यात येत होता.