तेलंगणचे काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुस मुस्लिमीन चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली होती. ओवैसी हे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातातलं बाहुलं आहे असं रेड्डी यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता ओवैसी यांनी कठोर शब्दात उत्तर दिलं आहे. काँग्रेस फक्त आपल्या कपड्यांवरुन आणि दाढीवरुन आरोप करत असते, आरोप करायला काही मिळालं नाही की अशा प्रकारे आरोप केले जातात असं म्हणत ओवैसी यांनी रेड्डी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी एका रॅलीमध्ये रेड्डी यांना उत्तर दिलं. तुमच्याकडे (रेवंत रेड्डी) आमच्या विरोधात बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. त्यामुळे आता आमच्या कपड्याबाबत आणि दाढीविषयी बोलत आहात. मला कळसुत्री बाहुली म्हणत आहात मात्र मी म्हणतो ते तुम्हीच आहात. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात काही अंतर नाही असंही ओवैसी म्हणाले.

congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

तेलंगणमध्ये काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी म्हणाले, ओवैसी शेरवानीच्या आतामध्ये खाकी पँट घालातात. आरएसएसची खाकी पँट घालून ओवैसी विरोधाचं राजकारण करत आहेत. यावर आता ओवैसी यांनी पलटवार करत रेवंत रेड्डींवर टीका केली आहे. त्यांना ओवैसी यांनी उत्तर देत काही मुद्दा मिळाला नाही की आमच्या दाढी आणि कपड्यांवरुन आम्हाला टार्गेट केलं जातं असं ओवैसी म्हणाले आहेत.